गोपनीयता सूचना
शेवटचे अपडेट: 3 ऑक्टोबर 2026
NeonShield काय करते
NeonShield हे एक ब्राउझर एक्सटेन्शन आहे, जे JioHotstar, Zee5, SonyLIV, Airtel Xstream, Netflix आणि HBO Max वर जाहिरातींचे ब्रेक म्यूट करते, आणि Amazon Prime Video वर जाहिराती फास्ट-फॉरवर्ड करते. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा ऑन/ऑफ टॉगल आहे, आणि तुम्ही सुरू करेपर्यंत ते सगळे बंद असतात.
डेटा संकलन
NeonShield कोणत्याही प्रकारचा वापरकर्ता डेटा गोळा करत नाही. ते वैयक्तिक माहिती, ब्राउझिंग इतिहास, पेजवरील मजकूर किंवा वापराचे ॲनालिटिक्स गोळा करत नाही, साठवत नाही किंवा पाठवत नाही, आणि आमच्या सर्व्हरसह कोणत्याही सर्व्हरला काहीही पाठवत नाही.
तुमच्या डिव्हाइसवरील सेटिंग्ज
NeonShield प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी एक ऑन/ऑफ सेटिंग तुमच्या डिव्हाइसवर, ब्राउझरच्या एक्सटेन्शन स्टोरेजमध्ये (chrome.storage.local) ठेवते. इतर काहीही साठवले जात नाही, आणि या सेटिंग्ज कधीही तुमच्या डिव्हाइसबाहेर जात नाहीत.
| सेटिंग | काय लक्षात ठेवते |
|---|---|
| hotstarEnabled | तुमचा JioHotstar टॉगल |
| primeEnabled | तुमचा Prime Video टॉगल |
| zee5Enabled | तुमचा Zee5 टॉगल |
| sonylivEnabled | तुमचा SonyLIV टॉगल |
| airtelEnabled | तुमचा Airtel Xstream टॉगल |
| netflixEnabled | तुमचा Netflix टॉगल |
| hbomaxEnabled | तुमचा HBO Max टॉगल |
परवानग्या
एक्सटेन्शन ब्राउझरकडे या परवानग्या मागते:
| परवानगी | का लागते |
|---|---|
| storage | तुमच्या ऑन/ऑफ सेटिंग्ज तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह करण्यासाठी. |
| webRequest | JioHotstar च्या जाहिरात-ट्रॅकिंग पत्त्यावरून लाइव्ह स्ट्रीममधील जाहिरात ब्रेकची सुरुवात ओळखण्यासाठी. फक्त JioHotstar साठी वापरले जाते, आणि त्या एकाच पत्त्यावरून फक्त जाहिरातीचे नाव आणि लांबी वाचण्यासाठी. |
| tabs | जाहिरात ब्रेकदरम्यान JioHotstar टॅब म्यूट आणि अनम्यूट करण्यासाठी. |
| साइट ॲक्सेस | खालील पेजवर जाहिराती ओळखणाऱ्या स्क्रिप्ट चालवण्यासाठी. |
NeonShield कोणत्या साइट ॲक्सेस करू शकते
NeonShield फक्त खालील साइटवर चालते, आणि तेही फक्त तुम्ही सुरू केलेल्या प्लॅटफॉर्मसाठी. तुम्ही भेट देता त्या इतर कोणत्याही साइट ते पाहू शकत नाही. Amazon वर ते फक्त Prime Video ची पेज (/gp/video/) पाहू शकते.
| प्लॅटफॉर्म | साइट |
|---|---|
| JioHotstar | hotstar.com, jiohotstar.com, bifrost-api.hotstar.com |
| Prime Video | primevideo.com, amazon.com/gp/video/, amazon.in/gp/video/ |
| Zee5 | zee5.com |
| SonyLIV | sonyliv.com |
| Airtel Xstream | airtelxstream.in |
| Netflix | netflix.com |
| HBO Max | max.com, hbomax.com |
NeonShield पेजवर काय बदलते
जाहिरात ब्रेकदरम्यान NeonShield व्हिडिओ म्यूट करते, आणि Prime Video वर जाहिरात संपेपर्यंत प्लेबॅकचा वेगही वाढवते. ते जाहिराती ब्लॉक करत नाही, काढत नाही किंवा बदलत नाही, तुम्ही काय पाहता ते वाचत नाही, आणि प्लेबॅकमध्ये इतर कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही.
संपर्क
NUBEGINNINGS INDIA PRIVATE LIMITED. प्रश्न किंवा शंकांसाठी: hello@neonshield.in